Header Ads Widget

Responsive Advertisement

नवीन व्यवसाय सुरु करताय..?? हे चार सुत्र लक्षात असू द्या ...

नमस्कार मित्रांनो ,
हा माझा पहिलाच ब्लॉग आणि ही माझी पहिलीच पोस्ट...

आपण जस काही गोष्टी घेताना विचार करतो अगदी तसाच पण बारीक विचार धंदा ज्याला आपण व्यवसाय पन म्हणतो तो सुरु करताना करायला हवा......  आणि आपण अगदी तिथेच चुकतो...

जास्त वेळ न वाया घालवता आपण मुद्द्याकडे वळूया, शीर्षका प्रमाणे नविन व्ययवसाय सुरु करताना हे खालील चार सूत्र समजून घेतले पाहिजेत.


  • गरज (NEED)
  • नियत (HONESTY)
  • नावीण्यता (CREATIVITY)
  • पर्यायी उपाय (OPTION)
वरील मुद्द्यांच स्पष्टीकरण खालील प्रमाणे ,



गरज (NEED) : सर्वप्रथम आपण हे ओळखलं पाहिजे कि आपण नेमका जो व्यवसाय करतोय त्याची मार्केट मध्ये गरज काय आहे..?? ती आहे हे कळलं तर ती नेमकं कुणाला आहे जस कि आपण पाहतो टक्कल कमी करण्याचं तेल सगळे नाही वापरू शकत किंवा विकत घेणार नाहीत.. अगदी त्याच प्रकारे आपला माल आपण बनवलेलं प्रॉडक्ट हे कुणाला ? कसं ? किती ? कुठे ? आणि केव्हा ? उपयोगाचं आहे याचा अभ्यास आपण केला पाहिजे .. मित्रांनो मार्केट हे सर्वस्वी खरेदीदार किंवा गिऱ्हाईक यांच्यावर अवलंबून असत. तर आपण यांना प्रथम मुद्द्यात घेऊन आपलं प्रॉडक्ट बनवायला हवं.





नियत (HONESTY) : मित्रांनो, आपण जो व्यवसाय करतो त्यात प्रामाणिकता असणं फार गरजेचं असत... याने आपलं नाव आपल्या प्रॉडक्ट च नाव आणि त्याची इमेज वाढते .. उदा. आजही खेड्यात बिस्कीट पूड घ्यायचा असेल तर लोक पार्ले द्या म्हणतात कारण पार्ले ने मार्केट मध्ये ती इमेज निर्माण केलीये त्याला खूप काळ गेलाय पण ती इमेज खालावली नाही .. आणि त्याच इमेज वर आज पार्ले मार्केट मध्ये उच्च स्थान वर आहे.. अगदी असंच आपण जे काही बनवतोय जे काही विकतोय ते अगदी तंतो तंत क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये उत्कृष्ट असावं. आणि योग्य दरात ते विकलं जावं. आज आपण मार्केट मध्ये पाहतो फसवेगिरी खूप वाढलेली आहे. हि फसवेगिरी फार काळ टिकत नाही मित्रानो सर्व कंपन्यांचे डुप्लिकेट प्रॉडक्ट बाजारात अव्हेलेबल आहेत.



नावीण्यता  (CREATIVITY) : मित्रांनो, बाजारात खूप प्रकारचे प्रॉडक्ट मिळतात आणि कोणताही एक प्रॉडक्ट असंख्य वेगवेगळ्या  कंपन्या बनवतात आणि प्रत्येक कंपनी च म्हणणं असत आमचं प्रॉडक्ट चांगलं .. आणि जे कस्टमर च्या खरेदीदाराच्या मनात घर करून जात तेच विकत आणि जर ते प्रॉडक्ट खरंच चांगलं असेल तर ते विकत राहत.. आणि लक्षात घ्या प्रत्येक प्रॉडक्ट ची एक लाईफ असते काही काळानंतर त्यात बदल किंवा रिप्लेस करावं लागत अगदी माणसा सारखं .. उदा. कोडेक कॅमेरा , नोकिया मोबाईल, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही, असे खूप काही प्रॉडक्ट्स आपण पाहतो.. कंपन्या बंद पडल्या त्यांना त्यांच्यात बदल घडवून आणता आला नाही किंवा त्यांचा गर्व त्यांना नडला.. म्हणून मित्रांनो आपलं प्रॉडक्ट इतरांपेक्षा कसं वेगळं आणि चांगलं बनवता येईल याचा वेळो वेळी आपल्यला अभ्यास करावा लागेल तर आणि तरच आपण पुढे प्रगती करत राहु.


पर्यायी उपाय  (OPTIONS) : मित्रांनो, आपण बाजारात पाहतो बिर्ला ग्रुप , रिलायन्स ग्रुप, टाटा ग्रुप , यांचे अनेक धंदे आणि व्यवसाय आहेत . समजा एखादा व्यवसाय कोणत्या कारणाने या वर्षी चालला नाही तर त्याची उणीव त्याचा तोटा दुसरे व्यवसाय भरून काढतात , आता तुम्ही मला म्हणाल आम्ही एक व्यवसाय सुरु करतोय त्यात च इतका खर्च झालाय आणि अजून दुसरा व्यवसाय कसा टाकू , मी सांगितलेलं उदाहरण हे व्यापक आहे. त्याचाच छोटं उदाहरण घ्या पार्ले कंपनि आहे जी बिस्कीट बनवते (टीप : पार्ले फक्त बिस्कीट बनवत नाही त्यांचे अजून हि व्यवसाय आहेत) आधी ते फक्त पार्ले ग्लुकोज बिस्कीट बनवायचे  नंतर त्यांनी गरजे नुसार वेग वेगळे बिस्कीट बनवायला सुरुवात केली वेगवेगळ्या प्रॉडक्ट रेंज बाजारात आणल्या. समजा पार्ले चा ग्लुकोज नाही चालला या वर्षी दुसरा चालेल तो हि नाही चालला तिसरा चालेल. अगदी असंच आपण पण करायचंय आपल्या प्रॉडक्ट ला दुजोरा आणि पाठबळ देण्यासाठी आपल्याला एक छोटी रेंज बनवून बाजारात उतरायचं जेणे करून आपल्या होणाऱ्या एका प्रॉडक्ट मधला तोटा दुसरा प्रॉडक्ट सहजतेने मिळवून देईल.


तर मित्रांनो , आशा करतो हे आर्टिकल तुम्हाला आवडला असेल आणि मी इथे आपली रजा घेतो, व्यवसाय सुरु करण्या बाबत काही प्रश्न काही संकल्पना असतील तर मला कळवू शकता आपण त्यावर विचार विनिमय करू शकतो. आणि हो हे आर्टिकल कसं वाटलं हे कंमेंट करून कळवा. नवीन आर्टिकल लवकरच येईल. धन्यवाद 

Post a Comment

0 Comments